जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील जुन्या अपार्टमेन्टमधील स्वतंत्र नळ जोडणी मिळण्यासाठी जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. याबाबत मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील 25 वर्षापासून जुने शेकडो अपार्टमेन्ट आहेत. त्यामधील प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळजोडणी आहे. त्याद्वारे प्रत्येक फ्लॅट धारकांना स्वतंत्र्यरित्या शुध्द पाण्याचा पुरवठा होता. नुकतेच अमृत योजनेची नविन जलवाहिनी संपूर्ण शहरात टाकण्यात आली आहे. त्या नविन जलवाहीनीवरुन जुन्या नळांना स्वतंत्र्यरित्या जोडणी करून द्यावी अशी मागणीचे अनेक अर्ज महापालिका प्रशासनाकडे आलेले आहेत.
दरम्यान, महानगरपालिका प्रशासनातर्फे जुन्या अपार्टमेंन्टला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन न देता एका अपार्टमेंन्टला एकच कनेक्शन देण्याचे तोंडी सांगितले जात आहे. तसेच अपार्टमेंन्ट परिसरात पाणी साठवण टाकी बनवावी अशी सुचना दिल्या जात आहे. यासोबतच काही मागण्याचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना दिले आहे.
निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षऱ्या
जिल्हाध्यक्ष ॲड.जमिल देशपांडे, शहराध्यक्ष किरण तळेले, विनोद शिंदे, उपशहराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



