सोयगाव तालुका प्रतिनिधी
शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाचे, कै.बाबुरावजी काळे स्कूल, सोयगांव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शिबीर घेण्यात आले यावेळी शाळेत योगप्रशिक्षण घेतलेला प्रथमेश काटोले या विद्यार्थ्याने शाळेतील विद्यार्थ्यांना योगा चे प्रकार व योगासने कसा करावा याचे प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस यांनी विद्यार्थ्यांना योग ही काळाची गरज असून तो सर्व नागरिकांनी प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे,सध्याच्या काळात योग मनुष्याचे ताणतणाव कमी करतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने.सकाळी अथवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तेव्हा किमान दहा ते विस मिनिटे स्वतः साठी द्यावा.जेणेकरून जिवन हे सुखकर होईल.असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



