जळगाव ः प्रतिनिधी
काल रात्री विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर सर्वत्र विजयोत्सव साजरा होत असतांनाच अचानक शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने त्यांनी शिवसेनेचे 35 आमदारांना एकत्र घेवून सुरत गाठल्यानंतर आज सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर राजकीय भूकंप झाला आहे.
आज सकाळपासून राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. यामध्ये ठाण्याचे पालकमंत्री असलेले व शिवसेनेचे नेते ना.एकनाथ शिंदे हे गुजरातचे मंत्री सी.आर.पाटील यांनी त्यांना चांगलाच पाहुणचार केल्यानंतर आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावात म्हटले आहे की, भाजपासोबत युती करा व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार असाल तर शिवसेनेत थांबतो अन्यथा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची तयारी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेली आहे.
