मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.
नाना पटोले म्हणाले की, भाजपने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा खेळ सुरू केला आहे. मात्र त्यांचा हा खेळ यशस्वी होणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे. हा ऊन सावलीचे खेळ आहेय पाहूया महाराष्ट्रावर किती वेळ ऊन राहते असं म्हणत अखेरीस सत्याचाच विजय होईल असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. भाजपवर टीका करताना पटोले म्हणाले की, भाजप बहुमताचं स्वप्न पाहात आहे, मात्र महाराष्ट्र सरकारवर कुठलेही संकट आहे असं वाटत नाही. काल विधानपरिषदेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याबद्दल नेत्यांसोबत चर्चा आणि चिंतन करून पुढील कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींना माहिती कळवू असं पटोले म्हणाले. त्याचप्रमाणे आज मुंबई कॉंग्रेस पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली आहे त्या बैठकीसाठी नाना पटोले रवाना झाले आहेत.
नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची यादी
1. एकनाथ शिंदे – कोपरी
2. अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद
3. शंभूराज देसाई – सातारा
4. संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद
5. उदयसिंग राजपूत – कन्नड – औरंगाबाद
6. भरत गोगावले – महाड – रायगड
7. नितीन देशमुख – बाळापूर – अकोला
8. अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली
9. विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
10. संजय गायकवाड – बुलढाणा
11. संजय रामुलकर – मेहकर
12. महेश सिंदे – कोरेगाव – सातारा
13. शहाजीबापू पाटील – सांगोला – सोलापूर
14. प्रकाशराव आबिटकर – राधानगरी – कोल्हापूर
15. संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ
16. ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद
17. तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद
18. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
19. रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद
