भडगांव प्रतिनिधी
कजगाव ता.भडगाव कजगाव भडगाव मार्गावरील पासर्डी गावाजवळील वळणावर थांबलेल्या कामा जवळील नाल्यात मोटारसायकल सह चालक नाल्यात पडल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला सदर वळणावर आता पर्यंत दहा ते पंधरा अपघात झाले असुन अनेकजण जखमी, गंभीर जखमी झाले आहेत तर आज या वळणावरील थांबलेल्या कामाने एक बळी घेतल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे थांबलेले काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कजगाव भडगाव मार्गावरील कजगाव पासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी गावाजवळ वळणावरील थांबलेल्या कामा जवळ मोठे पुल आहे नेमके पुला जवळच वळण रस्ता काढण्यात आला आहे भडगाव कडुन येणारा वाहनधारक सिमेंट च्या बनलेल्या रस्त्याने सुसाट येतो रस्त्यावर थांबलेले काम कींवा वळण रस्ता असल्याचे लक्षात येत नसल्याने वाहन सरळ नाल्यात जाऊन आदळले असच काहि या मोटरसायकल चालकाचे झाले असेल थांबलेले काम व वळण रस्ता लक्षात न आल्याने सुदाम गुलाब सोनवणे वय ३० राहणार अंदानेर ता.कन्नड जि.औरंगाबाद हा परधाडे ता.पाचोरा येथे काहि कामा निम्मित गेला होता तेथुन रात्री परतत असतांना पासर्डी गावा जवळील वळणाचा अंदाज न आल्याने सरळ मोटरसायकल सह नाल्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या बाबत मयताचे सासरे गायकवाड बेलदारवाडी ता.चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे हे करत आहेत.
नाल्यात अनेक अपघात जळगाव चांदवड या महामार्गावर वळणावरील सारी काम थांबली आहेत जमीन अधिग्रहण चा खोडा असल्याने काम थांबली जमीन अधिग्रहण फाईल चा प्रवास सरकारी दप्तर दिरंगाई मुळे कासव पावली चालत असल्याने गेल्या महिन्यात राजपत्र प्रसिध्द झाले पुढील सोपस्कार धीम्या गतीने सुरू आहे मात्र थांबलेल्या कामावर अपघात मात्र नित्याची झाली आहेत आतापर्यंत अपघातात जखमी,गंभीर जखमी झाले मात्र आज थांबलेल्या वळणावरील कामाने बळी घेतल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असुन थांबलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे.