काय करावं राव, लोकांनी प्रभू रामालाही चुना लावला ; श्रीराम मंदिराच्या दानातील 22 कोटींचे चेक बाउन्स

0
15

नवी दिल्ली : रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सध्या देशातून आलेल्या निधीची मोजणी सुरू आहे.

ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून 30.99 कोटी रुपये, 100 रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून 372.48 कोटी रुपये आणि एक हजार रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून 225.46 कोटी रुपये आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून 1625.04 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशा प्रकारे 2253.97 कोटींचा निधी जमवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here