जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर खोटेनगरच्या पुढे असलेले हॉटेल मराठा मटन जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार MH.19.DQ.8749 जागीच ठार झाल्याची घटना दि.20 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी तालुका पोलिस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केल्याची प्राथमिक माहिती आहे.
