सावधान… पुन्हा ही धोक्याची घंटा, कोरोनाचा धोका वाढला

0
33

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 75 नवे कोरणा बाधित आढळले आहेत.

एका दिवसात 36 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे कुरणा बधितांचा आकडा 158 वर गेला आहे नाशिक शहरात यातील सर्वाधिक 103 बाधित आहेत. आतापर्यबत केवळ शहरात 4105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची संख्या नाशिक शहरासाठी पुन्हा ही धोक्याची घंटा आहे. हळूहळू घट्ट होणारा विळखा टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनानं आतापासून कठोर भूमिका घेण्याची गरज आहे

राज्यात आज 4 हजार 4 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचे 23,746 सक्रिय रुग्ण झाले आहेत. तर राज्यात रविवारी एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे आज 2087 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईचीही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here