मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसले तर पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही

0
12

जळगाव ः प्रतिनिधी
बांधकामाच्या मंजुरीसाठी मनपाच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केला जातो. परंतु मंजुरीनंतर प्रत्यक्षात नकाशाप्रमाणे बांधकाम केले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहे. आगामी काळात मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्यास संबंधिताना पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही असा इशारा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला आहेे.

गेल्या महिन्यात वास्तुविशारद, आर्किटेक इंजिनिअर यांची बैठक झाली होती.त्यात या संदर्भात सुचना दिल्या होत्या. बांधकाम प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 17 जून रोजी आयुक्तांसह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही बांधकामांची पाहणी केली. त्यात नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्याचे आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here