भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन गुरुवारी सकाळी शिर्डीत दाखल झाली आहे. या ट्रेनला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वे सेवेअंतर्गत खासगी ट्रेन प्रथमच धावली आहे. या पहिल्या खाजगी रेल्वेत ८१० प्रवाशांनी कोईम्बतूर ते शिर्डी असा प्रवास केला आहे.
खाजगी ट्रेनमधील सुविधा पाहता आणि कोईम्बतूर ते शिर्डी असा थेट प्रवास असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रेल्वेत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तुलनेत प्रवास भाडे थोडे जास्त असले तरी सुविधा मिळत असल्याने प्रवाशांनी खाजगी रेल्वेला पसंती दर्शवली आहे.
भारतीय रेल्वे खाजगी ट्रेनच्या माध्यमातून उच्च प्रतीची सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिल्या ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढील काळात आणखी खाजगी रेल्वे धावल्यास त्यात नवल वाटायला नको.
भारत गौरव योजना काय आहे?
१ ) या योजनेतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्या रेल्वेकडून भाडेतत्त्वावर गाड्या घेऊ शकणार आहेत.
२ ) भारतीय रेल्वेकडून भाडेतत्वावर घेतलेल्या या गाड्या कोणत्या मार्गावर चालवायच्या, भाडे किती आकारायचे आणि सेवा कोणत्या द्यायच्या इत्यादीचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात.
३ ) खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेगाडी भाडेतत्वावर देताना प्रवाशाची लुबाडणूक होणार नाही, याची खात्री भारतीय रेल्वेने केलेली असते.
१ ) भारतीय रेल्वेचीच ही योजना आहे.
२ ) पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
३ ) भारत गौरव योजनेंतर्गत कोईम्बतूर ते शिर्डी ही पहिली रेल्वेगाडी धावली.
४ ) या गाडीला २० डबे जोडण्यात आले आहेत.
५ ) प्रथम, द्वितीय आणि तृतीय इत्यादी श्रेणींचे
वातानुकूलित डबे त्याबरोबरच स्लीपर कोचचे डबे या गाडीला आहेत.
अग्निपथ योजनेविरोधात तरुण रस्त्यावर,आंदोलनाला हिंसक वळण; रेल्वेवर दगडफेक
गाडीत काय काय ?
१ )ट्रेन कॅटनच्या हाती गाडीची सूत्रे असतील.
३ ) प्रवाशांना शाकाहारी भोजन दिले जाईल.
४ ) दर एक तासाने स्वच्छता कर्मचारी गाडी स्वच्छ करतील
कोईम्बतूर ते शिर्डी प्रवास असा….
कोईम्बतूर येथून सायंकाळी सहा वाजता गाडी शिर्डीसाठी रवाना होईल. व) वाटेत विरुपूर, इरोड, सालेम, जोरापेट, बंगळुरु, येलहाका, धर्मवारा, मंत्रालयम रोड आणि वाडी या स्थानकावर गाडी थांबेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गाडी शिर्डीला पोहोचेल.