एकाने केला तीन तरुणावर चाकू हल्ला ; तरुण गंभीर

0
21

यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव येथे रात्री उशीरा एकाने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये तीन तरूण जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, १५ १५ जुनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास किनगावातील शाह नामक तरूणाने तौसीफ समीर तडवी (वय१९ ), शरीफ लुकमान तडवी ( वय १९) व सद्दाम नवाज तडवी (वय २०) या तीन युवकांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात हे तिन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून तिघांनाी यावलच्या ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले आहे.
या तिघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी प्रथमोपचार करून यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय विद्यालयात पाठवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे व पोलीस नाईक राजेन्द्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदर घटनेतील जखमींची माहीती घेतली असुन, त्या हल्ला करणार्‍या तरूणा विरुद्ध रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते . दरम्यान हल्ला करणारा तरूण मात्र फरार असल्याचे वृत्त आहे. रात्री उशीरापर्यंत याबाबत पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here