नवी दिल्ली ः
जेवणाखाण्याचे पदार्थ, फळे-भाज्या आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने ठोक महागाई दर (डब्ल्यूपीआय) 15.88 टक्क्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. हा 30 वर्षांत याचा सर्वात उच्च स्तर आहे.याआधी ठोक महागाई ऑगस्ट 1991 मध्ये यापेक्षा(16.06 टक्के) होता. या वर्षी एप्रिलमध्ये दर 15.08 टक्के आणि गेल्या वर्षी मेमध्ये 13.11 टक्के होता. हा एप्रिल 2021 पासून सतत 14 व्या महिन्यात 10 टक्केवर आहे. सलग तिसऱ्या महिन्यात यात वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँक पतधोरण निश्चित करताना किरकोळ महागाई दराच्या आकड्याला प्राधान्य देते.सोमवारी आलेल्या किरकोळ महागाईच्या आकड्यांत मे दरम्यान ही मासिक आधारावर 7.79 टक्के वरून घटून 7.04 टक्के नोंदली आहे मात्र, ही सलग पाचव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्ट कक्षेच्या वर राहिली. घाऊक महागाई दर वाढल्याने प्रमुख व्याजदरांत आणखी वाढ होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
चार महिन्यांनंतर दुहेरी आकड्यांत
भाजी, बटाटे, गहू आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमतीतील वृद्धीमुळे खाद्यपदार्थांच्या महागाईने 4 महिन्यांनंतर दुहेरी आकडा ओलांडला आहे मात्र, कांद्यात 20.40 टक्के घसरण दिसली. खाद्यपदार्थांची महागाई मे मध्ये 12.34 टक्के राहिली. ही एप्रिलमध्ये 8.34 टक्के होती. दुसरीकडे एका वर्षात क्रूड 79.50 टक्के महाग झाले.