जळगाव ः प्रतिनिधी
जैन सोशल ग्रुप जळगावचा स्नेहमिलन सोहळा नंदग्राम (भुसावळ) येथे नुकताच झाला. त्यात 110 सदस्य परिवारासह सहभागी झाले होते.
स्विमिंग, रेन डान्स, विविध खेळ खेळवण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष प्रियेश छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन राहुल राका, रूपल राका, जितेंद्र बोरा, निर्मला बोरा, राजेश भंडारी, किशोर चोपडा व योगेश चोपडा, पंकज जैन, आनंद श्रीश्रीमाळ, अनिल पगारिया, विजय सांड, तेजस कावडिया, संदीप रेदासनी व जैन सोशल गृपच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.