जळगाव ः प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाउनतर्फे आजची काळजी उद्याची सुरक्षितता स्त्रियांचे कॅन्सर याविषयावर स्त्रीरोग व कर्करोग तज्ञ डॉ.श्रद्धा चांडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
गणपती नगरातील रोटरी हॉल येथे झालेल्या व्याख्यानात डॉ.चांडक ह्यांनी स्त्रियांमध्ये होणारे वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर व त्याच्या योग्य वेळी स्वतः किंवा वेगवेगळ्या क्लिनिकल चाचण्या कडून निदान करण्याची गरज, स्त्रियांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर, ओवेरियन कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर यांचे कारणे लक्षणे निदान पद्धत व त्याची उपचार पद्धत यांच्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कमी वयात मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व पुरुषांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर याच्यावर पण मार्गदर्शन केले.
याशिवाय कॅन्सर निदानसाठी नवीन चाचण्या व कार्यक्रम रोगाचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर स्पोर्ट केमोथेरेपी, वेगवेगळ्या लेप्रोस्कोपिक सर्जरी, व त्याच्यात होणारे त्रासांना कशा कमी करता येईल याच्यावर त्यांनी माहिती दिली. सध्याची जीवनशैली व खानपानमध्ये होणारे बदल त्याव्यतिरिक्त वाढते वयानुसार आपल्या शरीरात कडे लक्ष न देणे व वेळेवर शरीरात होणारे बदल ह्याची काळजी न केल्यामुळे स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. योग्य वेळेवर स्वतः आपले शरीरात होणारे बदल यांची जाणीव कशी केली पाहिजे ह्याच्यावर डॉ. चांडक यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. विवेक वडजीकर, सचिव तारीक शेख,प्रकल्प प्रमुख डॉ. उषा शर्मा, आर.एन. कुलकर्णी, डॉ.अपर्णा मकासरे, दिलीप गांधी व सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.