राजकारणात,समाजात सदैव स्मरणात राहणारे माजी खासदार कै.हरीभाऊ जावळे

0
83

यावल ः तालुका प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार,माजी आमदार आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन हरीभाऊ जावळे हे दि.16जून 2020 रोजी आपल्या प्रिय शेतकरी बंधूंना आणि राजकारणाला, समाजाला सोडून निघून गेले, त्यानिमित्त गुरुवार दि.16 जून 2022 ला यावल तालुक्यातील भालोद येथे सकाळी 9 वाजता सखाराम महाजन पतसंस्था सभागृहात हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावल तालुक्यातील तसेच रावेर विधानसभा,रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

हरीभाऊंच्या आठवणी शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना येत नाही असा एकही दिवस उगवला नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि निमित्ताने या विकास पुरुषाची सतत आठवण आल्याशिवाय राहत नाही. सामान्य कुटुंबातील असामान्य नेता कार्यकर्त्यांच्या हृदयात, मनात आजही ठाण मांडून आहे,जिकड़े जाल तिकडे आणि पाहावे त्या ठिकाणी तसेच महाकाय जल पुनर्भरण विषयावर शासकीय अधिकारी,कर्मचारी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या चर्चा सुरू झाल्या की तसेच जिथे जाल तेथे आणि विकास कामाच्या ठिकाण पहाल, तेथे भाऊची आठवण आल्या शिवाय राहत नाही.

शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न शेळगाव बॅरेज जवळून जाताना ज्या रस्त्याने आपण जातो व पूर्ण झालेला शेळगाव बॅरेज आपल्याला दिसतो तेव्हा प्रत्येक माणसाला हरीभाऊंची आठवण येते व मन गहिवरून जाते किंबहुना यावल पंचायत समिती नवीन इमारत कार्यालय यावल तहसील कार्यालयामध्ये प्रवेश करताना इमारतीकडे पाहताना भाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही तसेच माझ्या बागायतदार केळी उत्पादक शेतकऱ्यांना उच्च दाबाने आणि नियमित वीज पुरवठा होण्याकरिता विरोदा,भालोद, डोंगरकठोरा,मोहगण,सातोद अशा अनेक ठिकाणी विद्युत वाहक उपकेंद्र उभारून शेतकऱ्यांना वीज पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. आमोदा ते पाल जाताना आपण ज्या रस्त्याने जातो तो मार्ग पहिला की हरिभाऊ डोळ्यासमोर येतात. अशी अनेक विकासाची कामे करून आपल्या कामाचा ठसा जनतेच्या हृदयात ठासून विकास हा पुरुष आपल्याला अर्ध्यात सोडून गेला. त्यामुळे मनाला मोठ्या वेदना होतात.

त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते हरीभाऊंचे चाहते बंधू-भगिनी यांनी गुरुवार दि.16 जून2022 रोजी भालोद येथे आपल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे तसेच पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, वृक्ष लागवड करून गरजू रुग्णांना आवश्‍यक त्या ठिकाणी फळ वाटप किंवा आपल्याला योग्य असे जे कार्यक्रम घेता येतील ते कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत,तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here