सुप्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांना फॉल्स – रोबोटिक सर्जरीत फेलोशिप प्रदान

0
32

जळगाव – प्रतिनिधी 

सुप्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांना अथक प्रयत्नांती फॉल्स – रोबोटिक सर्जरीत फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ.जोशी हे खान्देशातून एकमेव सर्जन आहे ज्यांना ही फेलोशिप जाहिर झाली.

इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेशियल इंडो – सर्जन्सद्वारे डॉ.मिलींद जोशी यांनी अ‍ॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरीतील फॉल्स – रोबोटिक सर्जरीसाठी खुप मेहनत घेतली असून त्यांच्या मेहनतीला यश आले ते १२ जून रोजी… फॉल्स – रोबोटिक सर्जरी चीफेलोशिप डॉॅ.मिलींद जोशी यांना प्रदान करण्यात आली. याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.मिलींद जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच आपल्यासारखे अभ्यासु डॉक्टर येथे आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगून, पुढील वाटचालीसाठी डॉ.पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड आदिंनीही अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here