मुक्ताईनगर प्रतिनिधी
येथील जी.जी.खडसे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आज दिनांक ०६ जून रोजी शिवस्वराज्य दिन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
या निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव भीमराव पवार यांचे “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराजांनी केलेल्या स्वाऱ्या त्याच पद्धतीने महाराजांनी खऱ्या अर्थानं जनतेचे स्वराज्य निर्माण केले, त्यासंदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.ए. महाजन होते. त्यांनीही महाराजांच्या एकंदरीतच कार्यकर्तृत्वांवर भाष्य केलं आणि महाराजांना यानिमित्ताने वंदन करून त्यांच्या स्मृती जागृत केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले, तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवेयांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी केला.