चोपडा प्रतिनिधी
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय गुणवत्ता वाढ व विकास कार्यक्रम अंतर्गत संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व संचालक पंकज बोरोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाचे विभाग प्रमुख ,प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. ८ ते १० जून रोजी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते.
प्रथम दिनी डॉ विवेक काटदरे – जळगाव (विद्यार्थी जीवनात विकसित करावयाची जीवन कौशल्ये व मानवी वैयक्तिक संपत्तीचे प्रकार ) व डॉ अतुल सुर्यवंशी -पाचोरा (कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स ) यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी डॉ प्रविण बन्सल -मुंबई (स्पर्धा परीक्षा तयारी व शिक्षक भूमिका) व .योगेश पाटील (रोबोटिक्स व शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान स्किल्स), तसेच एम व्ही पाटील व व्ही आर पाटील – चोपडा (शालेय गुणवत्ता वाढीत शिक्षकांचे योगदान व भविष्यातील आव्हाने ) , विजया पाटील व योगेश चौधरी (उत्तम शिक्षकांची गुण वैशिष्ट्य व शालेय जबाबदारी यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती ). तिसऱ्या दिवशी राजेश टंडन – भुसावळ (मार्केटिंग स्किल्स व विद्यार्थी -पालक -शिक्षक सुसंवाद ) डॉ प्रशांत वारके -जळगाव (व्यक्तिमत्त्व विकास व शालेय आरोग्य व्यवस्थापन) अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी बालसंस्कार केंद्र ,प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कुल च्या सर्व शिक्षकाना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळा,परिसर व कार्यालयीन व्यवस्थापन याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.या शैक्षणिक वर्षात पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल येथे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची गोडी वाढावी यासाठी संस्थेतर्फे *सुसज्ज अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब सुविधा असेल असे जाहीर करून प्रशिक्षण कार्यशाळेचा सर्वानी स्वविकास सोबतच विद्यार्थी विकास व शालेय गुणवत्ता वाढीसाठी सदुपयोग करावा असे आवाहन संचालक पंकज बोरोले यांनी कार्यशाळेचा समारोप केला. कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सोबत संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले , सौ. दिपाली बोरोले यांची विशेष उपस्थिती होती.
समारोप प्रसंगीं सर्व संचालक मंडळाने नवीन शैक्षणिक वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.कार्यशाळा यशस्वीतेसाठी एम व्ही पाटील , व्ही आर पाटील , मिलिंद पाटील, डॉ महादेव वाघमोडे , संदीप वन्नेरे रेखा पाटील व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.