सुधर्माच्या 100 विद्यार्थ्यांचा गौरव

0
39

जळगाव ः प्रतिनिधी
सुधर्मा संस्थेच्या पाचवी ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम व. वा. वाचनालयाच्या टिळक सभागृहात नुकताच पार पडला.
अरुण भोळे यांचा सपत्नीक व डॉ. हितेंद्र भोळे, शीतल भोळे व बळीराम पाटील यांचा सत्कार अनुक्रमे सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे,राजेंद्र चौधरी,सुनिता बेलसरे, सूर्यकांत हिवरकर यांच्याहस्ते गीता ग्रंथ देऊन करण्यात आला.निहारीका भोळेचे विद्यार्थिनींनी औक्षण केले.सुर्यकांत हिवरकर यांनी जगातील ‘कर्तृत्ववान प्रसिद्ध 101 महिला` हे पुस्तक भेट दिले. खेडी खुर्द, मन्यारखेडा, सावखेडा, समतानगर, नशिराबाद, राजीव गांधीनगर, बांभोरी येथील शंभर मुला-मुलींना वह्या, पेन, रजिस्टर, दप्तर असे साहित्य वाटप आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here