जळगाव ः प्रतिनिधी
येथील माधवबाग क्लिनिक व कांताई नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पू.ना. गाडगीळ येथील सभागृहात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले. मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात माधवबागच्या मधुमेह व अती ताणावात असलेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा पू.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतला. सदर शिबिर हे डॉ. अमोल कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.त्यात 100 हून अधिक रुग्णांनी सहभाग घेऊन लाभ घेतला.
डॉ. अमोल कडू यांनी बोलतांना सांगितले की, प्रत्येक मधुमेह पेशंट ने वर्षात एकदा तरी नित्याने डोळे तपासणी करावी. वेळेत योग्य निदान झाले तर नेत्र रोगाला व अंधत्वला आळा बसवण शक्य होईल. माधवबागच्या डॉ. श्रद्धा माळी यांनी बोलतांना सांगितले की, मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे व सामाजिक बांधीलकी तसेच समाज रुग्णांच्या भावनेतून हे उपक्रम घेण्यात येतात व भविष्यात देखील माधवबागच्या वतीने चांगले सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील याची हमी दिली.