राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयाचा भारतीय जनता पार्टी,बोदवड़ तर्फे आतीषबाजी व पेढ़े वाटून जल्लोष करण्यात आला

0
29

बोदवड प्रतिनिधी

आज दिनांक 11 जून रोजी महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मा. विरोधीपक्ष नेते देवेंद्र; फडणवीस यांच्या चाणक्य नितीने भारतीय जनता पार्टी ने ज्यांच्यावर राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती असे भाजपा चे ज्येष्ठ नेते गिरीषभाऊ महाजन, आशीषजी शेलार, व प्रसादजी लाड़ यांनी केलेल्या योग्य नियोजन व रणनीतीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पुरेशे संख्याबळ नसतांना महाविकास आघाडीत फुट पाडून तीन जागेवर भारतीय जनता पार्टीचे पियुषजी गोयल, डॉ.अनिल बोंडे व धनंजय महाडिक या उमेदवारांचा विजय झाला. म्हणून भारतीय जनता पार्टी,बोदवड़ तर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला.

त्यावेळी भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष प्रभाकरभाऊ पाटील, शहराध्यक्ष नरेशभाऊ आहूजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष राम आहूजा, शहराध्यक्ष अभिषेक झाबक, शहर उपाध्यक्ष राहुल माळी, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस चेतन तांगड़े, सोशल मिडिया सह संयोजक सागर गंगतीरे, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय अग्रवाल, पवन जैन, नरेशकुमार रंगलानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते असे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल यांनी कळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here