जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील कॅरीबॅग विक्रेते,व्यावसायिक, उत्पादक यांना महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा अधिनियमाची माहिती नसल्याकारणाने महानगरपालिकेकडून होणाऱ्या प्लास्टिक निर्मूलनाबाबतच्या कारवाईस बऱ्याचशा व्यावसायिकांकडून प्लास्टिक निर्मूलनाच्या कारवाईस विरोध होत असतो. त्यामुळे प्लास्टिकच्या कोणकोणत्या वस्तुंचे उत्पादनांवर निर्बंध आहे याचे विक्रेत्यांना अधिनियम ज्ञात नसल्याने दुकानदार व मनपा प्रशासन, कर्मचारी यांचे वाद होऊ नये यासाठी प्लास्टिक विक्री करणारे व्यावसायिक विक्रेत्यांनी 9 जून रोजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची त्यांचे कार्यालयात भेट घेऊन प्लास्टिक अधिनियमांतर्गत निर्बंधाची माहिती व कायद्याची माहिती होणेसाठी सर्व प्लास्टिक विक्रेते,व्यापारी वर्गाची काल रोजी मनपा सभागृहात दुपारी बैठक बोलावणेसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सदर बैठकीचे मनपा सभागृहात आयोजन करण्यात आले.
या बैठकीमध्ये आयुक्त डॉ.विद्या गायकवाड तसेच उपायुक्त (महसूल) प्रशांत पाटील, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. चव्हाण,श्री.ठाकरे तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले
या बैठकीत आरोग्य अधीक्षक यु. आ. इंगळे, एल.बी. धांडे, एन. इ. लोखंडे निरीक्षक, जे. के. किरंगे निरीक्षक हे उपस्थित होते तसेच जळगाव शहरातील प्लास्टिक विक्री करणारे व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती



