दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचा  9 रोजी श्रद्धांजलीचा कार्यक्रम  : आनंद शिंदे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायकांची राहणार उपस्थिती… 

0
58
मुक्ताईनगर – प्रतिनिधी 
सुप्रसिद्ध आंबेडकरी ख्यातनाम कवी गायक दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम येत्या 9 रोजी  भदन्त विशुद्धानंद  बोधी तसेच भारतीय बौद्ध महासभेचेतर्फे आयोजित करण्यात आला असून त्याच रोजी  गीत गायनाच्या माध्यमातून  श्रद्धांजलीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
          या कार्यक्रमास पूज्य भदन्त विशुद्धानंद बोधी व त्यांचा पवित्र भिक्षु संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्यासह प्रसिद्ध  कवी गायक आनंद शिंदे  प्रकाशनाथ पाटणकर, विष्णु शिंदे , दत्ता शिंदे  तसेच शिंदे परीवार शाहीर डी.आर.इंगळे, राहुल अनविकर  , नागसेन  सावदेकर  , प्रा.डॉ.किशोर वाघ, कुणाल  वराळे , नानासाहेब इंदीसे , विजय मांडकेकर , राजाभाऊ शिरसाट, संतोष गायकवाड, धम्मानंद शिरसाट, देवा अंभोरे , सपनाताई खरात ,  गायिका आशा चरवे , प्रमोदिनी साठे  , कल्पना खंडेराव , शालिनी शिंदे , देविदास येवले , मेघानंद जाधव , सारंग पवार , सागर पवार विशाल व साजन बेंद्रे  तमाम   तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील प्रताप सिंग बोदडे यांचे गायक-गायिका  शिष्य मोठ्या संख्येने गीतांच्या रूपाने दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. तरी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने श्रद्धांजली या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here