जळगाव : प्रतिनिधी
ॲम्बीस संगणकीय प्रणालीचे उद्घाटन आज सकाळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक विठठल ससे, पोलीस निरीक्षक श्री. ठोंबे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक(अ.मु.) वसंत कांबळे, पोलीस उप निरीक्षक(अ.मु.) सचिन डोंगरे आदी अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
संगणकीय प्रणालीमध्ये आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, चेहरा (छायाचित्र). डोळ्यांचे बुबुळ हे डिजिटल स्वरुपात जतन करून जुळवण्याची क्षमता आहे. पोलीस ठाणे स्थरावर प्रणाली राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. या प्रणालीमध्ये सुमारे 6 लाख 50 हजार अटक व शिक्षा पात्र आरोपींचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आला आहे. ही प्रणाली भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम,सीसीटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील नाफीज या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.जिल्हयात सर्व पोलीस ठाण्यात प्रणालीचे हार्डवेअर, सॉप्टवेअर पुरविण्यात आले आहे.
पूर्वी पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांचा गुहेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. ॲम्बीज प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या पोट्रेबल ॲम्बीज या यंत्रणेच्या वापर करून गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिटद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटातच शक्य होणार आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होऊन राज्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
पुर्वी गुन्हेगारांच्या बोटाच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जायची मात्र आता संगणकीकृत केलेल्या किंवा होणाऱ्या हाताचे बोटांचे ठसे, तळहाताच्या पत्रिका, डोळ्यांचे बुबुळ, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बारी, अशोक महाजन, पो.हे.काँ. जयंत चौधरी, पो.ना. विनायक पाटील, पो.ना. किशोर मोरे, पो.कॉ. सचिन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.