डिजिटल युगातही सुंदर हस्ताक्षराला महत्व

0
23
फैजपूर l प्रतिनिधी
एक महिन्यापासून सुरू असलेल्या स्वामीनारायण मंदिरातील मोफत सुंदर हस्ताक्षर शिबिराचा समारोप  परीक्षा घेऊन करण्यात आला.  या सुंदर हस्ताक्षर परीक्षेत  जे टी महाजन मीडियम स्कूल इयत्ता ९ वी चा विद्यार्थी गोपाल नंदकिशोर अग्रवाल याने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक चेतना नितीन पाटील, तृतीय क्रमांक कल्याणी संदीप चौधरी यांनी मिळविला. या सुंदर हस्ताक्षर रत्नांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक तथा कथाकथनकार प्रा. व. पू. होले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आजच्या डिजिटल युगात हस्ताक्षराला महत्व असून सुंदर हस्ताक्षर असणे हा माणसाचा एक दागिना, अलंकार आहे. हा अलंकार आपण एक महिन्यात वेगवेगळे पैलू रुपी आकाराने घडवला आहे. हस्ताक्षर रुपी अलंकार आता कायमस्वरूपी घडवत राहिल्यास सुशोभित दिसेल. विद्यार्थ्यांना अभ्यासा सोबत सुंदर हस्ताक्षर असणे गरजेचे आहे. काळानुसार आपल्यात बदल केले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालीकडे जागृत राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी घरात सुसंवाद साधावा. घरातील सर्व व्यक्तींशी नियमितपणे संभाषण केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. व. पू. होले सावदा यांनी लक्ष्मी नगर मधील स्वामीनारायण मंदिरातील उपस्थित विद्यार्थी यांना सांगितले.
एक महिन्या पासून सुरु असलेल्या मोफत सुंदर हस्ताक्षर शिबिराचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर धनजी फिरके होते. यावेळी पी. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष पी. के. चौधरी, प्राचार्य संजय वाघुळदे, सुरेश महाजन, कलाशिक्षक व्ही.ओ.चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here