सिन्नर पोलिसांनी हस्तगत केल्या महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या मतपत्रिका, भाजपा तर्फे आंदोलनाचा इशारा

0
73

 

विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या निवडणुकीतील • मतपत्रिका नाशिक जिल्ह्यातील आहे. ती विविध भागातून गायब होत असल्याचा प्रकार सिन्नर पोलिसांच्या मदतीने मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी उघडकीस आणला आहे.

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु झाली असून

राज्यभरातून ३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यासाठी राज्यातून २ लाख ८५ हजार मतदार बॅलेटपेपर द्वारे करणार मतदान करत आहे. फार्मसी कौन्सिलद्वारे मतदारांना पोस्टाद्वारे बॅलेट पेपर पोहोच केले जात असून दिनांक २३ मे ते १७ जून दरम्यान मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत

दरम्यान, पोस्ट ऑफिसमधून प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचे बॅलेट पेपर परस्पर गायब होत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी उघडकीस आणला आहे. सिन्नर पोलिसांनी छापा टाकून सिन्नर येथील सचिन वाळुंज

यांच्या मेडिलाईन एजन्सी मध्ये ४४ बॅलेट पेपर तर अतुल झळके यांच्या शिवकृपा मेडिकलमधून २५ बॅलेट पेपर हस्तगत केले. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात खाडगीर यांनी तक्रार दाखल केली आहे.

असाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असल्याचा आरोप मध्य महाराष्ट्राचे उमेदवार खाडगीर यांनी केला आहे. बहुतांश मतदारापर्यंत मतपत्रिकाच पोहचत नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत मुंबईस्थित (मुलुंड) निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा युवा सोशल मीडिया चे प्रदेश संयोजक तसेच परिवर्तन पॅनल चे समर्थक आणि प्रचारक श्री तन्मय सुनिल जैन यांनी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल.निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबवावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील.असा इशारा दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here