फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ भारत संकल्पनेचा स्वीकार करून स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्राच्या वेस्ट झोन मध्ये ८२ रँकिंग मिळविलेल्या नगरपालिकेतील अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. शहरामध्ये ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे शहरवासीयांचा मुख्याधिकारी साहेबांना प्रश्न आहे की, आम्हाला न्याय मिळेल का ?
स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून विविध ठिकाणी सोयीसुविधा नगरपालिकेकडून तयार करण्यात येतात मात्र त्याची टिकाऊ व यशस्वी अंमलबजावणी होत नाही. शहराची साफसफाई करण्यासाठी लाखो रुपयाचा स्वच्छतेचा वार्षिक ठेका देण्यात आला आहे. या ठेक्यापोटी कोटी ठेकेदाराला लाखो रुपये नगरपालिकेने मोजून दिले मात्र पंधरा-वीस दिवसातून एक वेळाही संबंधित सफाई कर्मचारी वाड्या वस्त्यांमध्ये सफाई करायला नियमित येत नाही अशी प्रत्येक कॉलनी वासियांची ओरड आहे. दैनंदिन स्वच्छतेसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो मात्र नागरिकांना त्या पद्धतीची सोयीसुविधा नगरपालिकेकडून उपलब्ध होत नसल्याने शहरवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. या बाबीकडे मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे ही मागणी शहरवासियांना कडून केली जात आहे.