मनपाच्या मोहिमेत महाबळ व मु.जे.महाविद्यालय

0
24

 जळगाव ः प्रतिनिधी
मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड तसेच अतिरिक्त आयुक्त       श्‍्याम गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख  संजय ठाकूर यांनी त्यांचे सहकाऱ्यांसमवेत काल सकाळी महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौक ते स्वातंत्र्य चौकातील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असलेल्या फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करून त्यात 11 वजन माप काटे तसेच त्यांच्याजवळ असलेल्या साधारणतः दोन ते तीन किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई केली.
तसेच शहरातील एम. जे.कॉलेज गेट समोरील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे पाणीपुरी व चायनीज गाडी व्यावसायिकांवर तसेच इतर हॉकर्स व्यावसायिकांवर काल संध्याकाळी  अचानक अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यात   या  हॉकर्स व्यावसायिक गाड्या जप्तीची कारवाई मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे
जळगाव शहरात यापुढे अशा हॉकर्स व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई सातत्याने अतिक्रमण विभागामार्फत करण्यात येईल असा इशारा  आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी  मनपा प्रशासनातर्फे दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here