विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी
मुख्य वीजतारेचा शोर्ट सर्किट होवून शेतात घर्षण होवून वीजतारा पडल्याने शेतातील गोडावून सह शेताला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे एक लक्ष,पन्नास हजाराचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री जंगलीकोठा शिवारात घडली याप्रकरणी महसूल च्या पथकाने रात्रीच या घटनेचा पंचनामा केला असून यामध्ये सदरील शेतकऱ्याचे तब्बल वीस क्विंटल मक्यासह शेतीचे औजारे,ठिबक सिंचन आदी जळून खाक झाले आहे.
जंगलीकोठा शिवारात शेतकरी भानुदास ढेपले यांचे गट क्र-८५ शेत आहे यामध्ये त्यांनी उन्हाळी मक्याची लागवड केली होती परंतु मजुरा अभावी कापणी व काढणी रखडल्याने निम्मा मका शेतात तर काही मका कापणी करून गोडावून मध्ये साठवून ठेवला होता परंतु गुरुवारी त्यांच्या शेतात अचानक मुख्य वीज वाहिनीमध्ये शोर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत पाच एकरातील मक्याच्या पिकला आग लागली तर वीस क्विंटल;मका कापणी करून ठेवलेला असतांना आगीचे लोळ गोडावून पर्यंत गेल्याने या आगीत वीस क्विंटल मका जळून खाक झाला आहे त्यातच खरीपासाठी जुळवणी करून ठेवलेली शेतीचे औजारेही या आगीत भस्मसात झाल्याने खरीपाची मशागतही रखडली आहे घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी पठान यांनी तातडीने घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरापर्यंत अहवाल सोयगाव तहसील कार्यालयाला पाठविला असून रात्री उशिरापर्यंत या आगीत अजून किती नुकसान झाले याची अद्यावायात माहिती हाती आलेली नव्हती आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम हाती घेण्यात आलेले होते रात्री उशिरापर्यंत आगीची माहिती हाती आलेली नव्हती महावितरणचे पथक रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहचलेले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.