वैयक्तिक वादातुन जवानांनी एकमेकांवर झाडल्या गोळ्या – दोघांचाही मृत्यू

0
74

 

गडचिरोली :- राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांनी एकमेकांवर वैयक्तिक वादातुन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. या गोळीबारात दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या मृत जवानांची नावे असून दोघेही गडचिरोलीत मरपल्ली येथील पोलिस मदत केंद्रात तैनातीस होते. दोघे ही दौंड पुणे येथील सीआरपीफ कॅम्पचे जवान होते. दोघांनी वैयक्तिक वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here