जळगाव ः प्रतिनिधी
महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2022 चे आयोजन 4 जून रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत महात्मा गांधी उद्यान,नवीन बस स्टँड जवळ करण्यात आले आहे.
ही स्पर्धा फक्त जळगाव शहरातील विद्यार्थी (मुलामुलींसाठी) आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी अवश््य सहभागी व्हावे.महिला पर्यावरण सखी मंच जळगाव आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे नोंदणी
2 जूनपर्यंत करावी. नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
मनिषा पाटील राज्य उपाध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच- 94206 62093,छाया पाटील जिल्हा उपाध्यक्ष- 94215 16861,नेहा जगताप शहर प्रमुख- +91 86240 59388,मनिषा शिरसाठ तालुका प्रमुख- +91 93707 23034,ज्योती राणे जिल्हा कार्याध्यक्षा – 7588192110 असे आयोजक मनिषा पाटील, जयश्रीताई महाजन महापौर तथा राज्य तज्ञ मार्गदर्शक महिला पर्यावरण सखी मंच व श्रीमती ज्योती राणे सचिव जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.