पाळधी ता.धरणगाव ः वार्ताहर
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त गायक राजू बागुल विरुद्ध वैशाली किरण यांचा भीम गीतांचा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमात जळगाव जिल्हा आंबेडकरी समाजातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
भीमगीतांच्या कार्यक्रमात राजू बागुल व वैशाली किरण यांनी आपल्या गायनातून प्रबोधन केले. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली.कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले होते. कार्यक्रमास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, ॲड.राजेश झाल्टे, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक सुरेश सोनवणे, शालीक गायकवाड, दिलीप सपकाळे, संजय सपकाळे, शिवसेनेच्या जळगाव उपशहर प्रमुख सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे, शांताराम खैरे, वसंत सपकाळे, मिलिंद सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमास गुलाब कांबळे, अनुप पानपाटील, हाफिज खान, मिलिंद हिरोळे, रवि इंगोले व इतर पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.