कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली

0
52

अमृतसर : वृत्तसंस्था

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, काल पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात मूसेवाला यांचा मृत्यू झाला. मूसेवाला (27) हे जवाहरके या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्या शरीरात अनेक गोळ्या शिरल्याचे मानसाचे पोलीस उपअधीक्षक गोबिंदर सिंग यांनी सांगितले.
आणि आम्ही बदला घेतला
“सर्व भावांना राम राम, सत्‌‍ श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे,”असे गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.आमच्या साथीदाराच्या हत्येप्रकरणी मुसेवालाचे नाव समोर आल्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुसेवालाची जास्त ओळख असल्यामुळे त्याला शिक्षा झाली नाही. त्यामुळेच आज ही हत्या करण्यात आली आहे.
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही.के. भवरा यांनी सांगितले की, जेव्हा सिद्धू मुसेवाला घरातून बाहेर पडले तेव्हा वाटेत समोरू2 वाहने आली आणि त्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.
मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे.
कोण आहे गोल्डी ब्रार?
गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे. त्याचवेळी त्याचा साथीदार आणि टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा राजस्थानमधील अजमेर तुरुंगात बंद आहे. मूसेवाला यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून तीन एके-94 रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here