फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
येथील नरेंद्र विष्णू नारखेडे (अध्यक्ष, वै. ह. भ. प. डिगंबर महाराज मठ, पंढरपूर) यांचा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार 2022 देऊन शिर्डी येथे झालेल्या भव्य कार्यक्रम मध्ये गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राष्ट्रीय 18 वे अधिवेशन व गौरव समारंभ उत्साहात झाला.
यावेळी राजकीय सहकार व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय उत्कृष्ठ सामाजीक कार्य केल्या बद्दल हा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व साईबाबा संस्था शिर्डीचे मा अध्यक्ष व खासदार भाऊसाहेब खासदार वाकचौरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम शांती कमल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र नारखेडे यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना व पतसंस्था उपसा जलसिचन संस्था व राजकीय पक्ष पदावर व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजक संघाचे अध्यक्ष कोळकर यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून भाजपा राज्य प्रवक्ते अजित चव्हाण, संजय नवले, सुनील ढेपे, परब साहेब, डॉ.सुनील भावसार, हेमंत नेहेते, शेखर चौधरी आदी मान्यवर सह उपस्थित होते सूत्र संचालन सह्याद्री वहिनीचे निलेश परबत यांनी केले.