प्रतिनिधी : बोदवड
आज आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहराची “विस्तृत आढावा बैठक” शहरातील अग्रसेन भवन येथे संपन्न झाली. सदर बैठकीत जिल्हा परीषदच्या २ गटांचा आढावा व ४ पंचायत समिती गणांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन, तालुक्यातील बुथ रचना व आगामी सेवा व शासन पंधरवाडयात करायचे कार्यक्रम व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विवीध विषयांवर लोकप्रीय खासदार रक्षाताईं खड़से, बेटी बचाव-बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फड़के व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोकभाऊ कांडेलकर व जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मनुर ब्रू येथील गजानन शेळके, संभाजी ब्रिगेडला खिंडार पाड़त संभाजी ब्रिगेडचे तालुका संघटक गणेश लोणारे यांच्या सह ७ लोकांनी पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल यांनी केले, सूत्र संचालन धनराज सुतार व आभार प्रर्दशन उमेश गुरव यांनी केले.
यावेळी सदर बैठकीस बेटी बचाओ बेटी पढ़ाओ राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फड़के, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदु महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक अनंतराव कुलकर्णी, बोदवड़ तालुका निवडणुक प्रभारी श्री.नवलसिंग पाटील, नगरसेवक श्री.विजुशेठ बडगूजर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा चिटणीस संतोष खोरखेडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्षा अनिता अग्रवाल, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल, तालुका उपाध्यक्ष विक्रमसिंग पाटील, भागवत चौधरी, मुक्ताईनगर तालुका सरचिटणी विनोद पाटील, बोदवड सरचिटणीस राजेंद्र डापसे, अमोल देशमुख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, जीवन माळी, सरचिटणीस वैभव माटे, भाजयुमो जिल्हा कोषाध्यक्ष राम आहूजा, भाजयुमो शहराध्यक्ष अभिषेक झाबक, भाजयुमो शहर उपाध्यक्ष राहुल माळी, सोशल मिडिया सह संयोजक उमेश गुरव, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस चेतन तांगडे, संजय अग्रवाल, दिलीप घुले, मधुकर पारधी, सुनिल माळी, संजय पाटील, पवन जैन,मयुर बडगुजर भारतीय जनता पार्टीचे बोदवड़ तालुक्यातील सर्व आघाड़यांचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.