विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या विहिरीत सुमारे 4 वर्षीय मादी जातीचे बिबट्या पडला होता.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी मोठ्या अथक परिश्रमाने विहिरीतून बिबटयाला सुखरूपपणे पिंजऱ्यात बाहेर काढले आहे.ते सुखरूप असून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांनी दिली आहे.
रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान फरदापुर नियतपरिक्षेत्रातील सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकरी पंढरी संपत मस्के यांच्या मालकी गट क्र.98 मधील खाजगी विहिरीत वन्यप्राणी बिबट्या पडला असल्याची बातमी मिळालयावर वनपरिक्षेत्र अजिंठा व वनपरिक्षेत्र सोयगाव येथील वन कर्मचारी यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून वन्यप्राणी बिबट्या यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढले.त्यांनतर सोयगाव वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वन्यप्राणी बिबटची तपासणी करण्यात असून सदर मादी बिबट्या अंदाजे 3 ते 4 वर्षांचा असून तिचे वजन 55-60 किलो असल्याचे समजले तसेच ती शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असून सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा वनपरिक्षेत्र आधीकारी निलेश सोनवणे यांनी दिली आहे.सदरची बचाव मोहीम औरंगाबाद मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर,उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार,सिल्लोड सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती पुष्पा पवार,कन्नड सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे,सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ,अजिंठा वनपाल एच एच सय्यद,जामठी वनपाल पंढरी शिंदे,वनरक्षक राजपूत,दांडगे, देवकर, मूलताने, चेके, नागरगोजे,जाधव , नागरे,लवंगे, खरडे, चाथे, राठोड,वाघ,सागरे, श्रीमती केंद्रे ,बेराड, मगरे तसेच अजिंठा वनपरिक्षेत्रातील वनमजुर यांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडली.