जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे हरियाणा येथे 3 ते 13 जून दरम्यान होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघात संध्या मोरेची 48-50 किलो वजन गटात निवड करण्यात आली. तिला प्रशिक्षक नीलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवि नरवाडे, संतोष सुरवाडे,डॉ.सचिन वाणी, डॉ.सारिका वाणी, सूरज नेमाडे, राकेश पाटील,पीयूष भोसले, राकेश पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले, शारदा पाटील यांनी संध्या मोरे हिचा गौरव केला. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.