मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.