यावल (सुरेश पाटील)
दि.23 मे 2022 रोजी श्रीक्षेत्र शेगाव(गजानन महाराज)येथे महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाची राज्य आढावा बैठक राज्य अध्यक्ष बाळासाहेब सिदें पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यां बैठकीत जळगाव जिल्ह्यातील यावल येथील ज्ञानेश्वर महाजन यांची महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
पोलीस पाटील ज्ञानेश्वर महाजन हे 6 वर्ष यावल तालुका अध्यक्ष,12 वर्ष जळगाव जिल्हाध्यक्ष,5 वर्ष खांन्देंश होते. संघटने मधील त्यांचे उत्तम कार्य आणि संघटन लक्षात घेता आता त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून त्यांच्याकडे राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सर्वानुमते सोपविण्यात आली.
बैठकीत उपस्थित राज्य अध्यक्ष बाळासाहेब सिदें पाटील, राज्य कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साडुकें पाटील,राज्य कार्याध्यक्ष भ्रुंगराज परशुरामकर,राज्य सचिव कमलाकर मागलें,राज्य संघटक बळवतंराव काडे पाटील, खजिनदार निंळकठ थोरात पाटील,पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोर पाटील,संघटक नवनाथ धुमाळ पाटील, मराठवाडा अध्यक्ष जब्बार भाई पटेल,पच्छिम महाराष्ट्र महीला आघाडी अध्यक्षा सौ.तृप्तीताई माडेंकर पच्छिम महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षा रोहीनी ताई हांडे,तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंद्र भाऊ,धरणगाव तालुका अध्यक्ष किशोर भदाणे, जिल्हा सचिव लखींचद भाऊ तसेच संपुर्ण राज्यातील विभाग अध्यक्ष व राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.