यावल शहरात भ्रष्टाचाराचे आणि निष्क्रियतेचे”खड्डे”लोकप्रतिनिधी, विविध संघटना गप्प

0
7

यावल(सुरेश पाटील)

यावल शहरात विकसित भागात पाणीपुरवठा योजनेचा “फियास्को” झाल्यामुळे पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डे खोदून ठेवल्याने तसेच खोदलेले खड्डे तात्काळ बुजविले जात नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,तसेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफ-सफाई करण्यासह,ओला व सुका कचरा वाहतूक व त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ सुरू आहे याकडे यावल शहरातील काही आजी-माजी नगरसेवकांसह अध्यक्ष तसेच विविध संघटना गप्प असल्याने आणि यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात आली.ही कोट्यावधीची कामे करताना संबंधित यंत्रणेने सोयीनुसार ठेकेदाराच्या नावाखाली टक्केवारी हडप केल्याने ठेकेदाराने त्याच्या सोयीनुसार आणि मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम न केल्यामुळे विकसित भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण झाला आणि पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे आता संबंधित ठेकेदार जागो जागी खड्डे खोदून पुन्हा पाईप लाईन दुरुस्तीचे काम करीत आहे,ही कामे करताना भर रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात येत आहे,खड्डे खोदल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पाईप लाईन व्हाल दुरुस्तीचे काम होत नसल्याने रहदारी करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना,रहिवाशांना मोठा अडथळा निर्माण होऊन त्रास सहन करावा लागत आहे हे यावल नगरपालिका प्रशासनाला तसेच यावल नगरपरिषदेच्या काही आजी-माजी अध्यक्षांसह नगरसेवकांना,विविध संघटना, समाजसेवकांना दिसून येत नाही का?ते गप्प का आहेत? निवडणुका लक्षात घेता तसेच निवडणुकीत आर्थिक आणि सामाजिक पाठबळावर विविध आमिष दाखवून आणि निवडणुकीत पुन्हा विजयी होणार असा आत्मविश्वास बाळगून इच्छुक सर्व उमेदवार “मुग” गिळून गप्प आहेत इत्यादी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून यावल नगरपालिकेच्या आर्थिक भोंगळ, बोगस कारभारास जबाबदार कोण?असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा होतो आहे किंवा नाही याची पडताळणी टेस्टिंग यावल नगरपालिकेने कोणाच्या मार्गदर्शनाखाली करून ठेकेदाराला कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन लाखो रुपयांची बिले कोणत्या नियमानुसार काढली आणि आता यावलकरांना पाणी पुरवठा होत नाही,झालेल्या रस्त्यांची इस्टिमेट बघितले असता इस्टिमेट मध्ये नमूद मटेरियल त्याच प्रमाणात वापरले गेले आहे का?याचे आत्मचिंतन टक्केवारी खाणाऱ्यानी करायला पाहिजे,यावल नगरपालिका मुख्याधिकारी मनोज म्हसे, बांधकाम शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख यांचे पाईप लाईन ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आहे किंवा नाही याबाबत तसेच ठिकठिकाणी खोदलेले खड्डे त्वरित बुजवावे यासाठी यावल शहरात चौकाचौकात चविष्ट चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here