भुसावळच्या वर्षी महोत्सवात 56 बालकांवर जनेऊ संस्कार

0
37

भुसावळ ः प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनीतील बाबा तुलसीदास उदासी यांच्या 39 व्या वर्षी महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील 56 बालकांवर जनेऊ संस्कार करण्यात आले. धार्मिक विधी प्रमाणे झालेल्या या संस्कारावेळी समाजबांधव उपस्थित होते.

सिंधी कॉलनीतील पूज्य बाबा कालिदास उदासी दरबारात वर्षी उत्सवाला शनिवारपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. या महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील 56 बालकांचे मंत्रोच्चारात जनेऊ (उपनयन) संस्कार करण्यात आले. सुमारे दोन तास हा धार्मिक विधी सुरू होता. यावेळी जनेऊ संस्कार होणाऱ्या बालकांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांची उपस्थिती होती.
या धार्मिक विधीसाठीची संपूर्ण व्यवस्था बाबा तुलसीदास बाबा कालिदास उदासी आश्रमातर्फे करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील तसेच मुंबई,कल्याण, नाशिक, इंदूर, सागर, बऱ्हाणपूर, विलासपूर, कटनी, भोपाल, नागपूर, अमरावती, चांदूर रेल्वे येथून भाविक व समाजबांधवांची उपस्थिती होती. वर्षी महोत्सवात गेल्या 14 वर्षांपासून हा सामुहिक जनेऊ संस्काराचा विधी केला जात आहे.

आज सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेदरम्यान शब्द कीर्तन, सकाळी 11 वाजता अखंड पाठक वाचनाची समाप्ती,दुपारी 1 वा. वर्षी उत्सव, दुपारी 1 वाजेपासून बाबा तुलसीदास बाबा कालिदास उदासी भक्त निवासात महाभंडारा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here