प्रतीनिधी कजगाव
नगरदेवळा तालुका पाचोरा येथील रहिवासी व पाचोरा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव महाजन उर्फ नाना महाजन यांनी आपल्या गाळन रस्त्यातील शेतात सिल्वर वृक्षाची लागवड केली असून ज्या झाडाच्या लाकडापासून जहाज बनवले जाते सदरचे लाकूड हे पाण्यात सडत वा कुजत नाही या वृक्षाचा कालावधी जवळपास 17 वर्षाचा असतो नाना महाजन यांनी सन 2011 मध्ये सिल्वर ओक वृक्षाची 20 गुंठे लागवड व उर्वरित शेताच्या बांधावर अन्य शेतात सेंद्रिय लिंबूलागवड केली आहे या वृक्षाचे लाकूडला मोठ्या प्रमाणात मागणी असून गुजरात राज्यातील भुज मधील कच्च येथील व्यापारी लाकूड घेण्यास येणार असल्याची माहिती नाना महाजन यांनी दिली आहेसंपूर्ण शेती विषमुक्त असून या ठिकाणी कुठल्याही रासायनिक खताचा वापर केला जात नाही गाईचे शेन व गोमूत्र पासुन जीवा अमृत बनवले जाते व ते शेतात टाकले जात आहे वर्षाकाठी निंबोणी तून जवळपास वीस ते बावीस लाखाचे उत्पन्न नाना महाजन यांना मिळत आहे.