जळगाव : प्रतिनिधी
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेवर गुजरातचे डॉ. मोंटू पटेल यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जळगाव जिल्ह्यातर्फे सत्कार आणि सन्मान जयपूर येथील अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणी सभेत करण्यात आला.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियात 35 वर्षांनंतर प्रथमच मेडिकल ट्रेंडमधून नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला स्थान मिळाले आहे. डॉ. पटेल हे गुजरात केमिस्ट असोसिएशनचे सक्रिय सभासद आहे. देशात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने जळगाव जिल्ह्याच्या वतीने डॉ. पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, गुजरात राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जसू पटेल, डोंबिवली असोसिएशनचे व्हाइस चेअरमन नीलेश वाणी, फार्मसी कौन्सिलचे माजी सदस्य दिलीप कदम उपस्थित होते.