यावल (सुरेश पाटील)
श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठ व गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची बदनामी करीत प्रसारमाध्यमांची दिशाभूल करणारी माहिती देऊन सेवकरी आणि नागरिकांच्या,भाविकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी यावल येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांना काल दि.17रोजी निवेदन वजा तक्रार देण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही यावल येथील श्री स्वामी समर्थ सेवा परिवारातील सेवेकरीअसुन शेतीचा व्यवसाय व व्यापार करून उदरनिर्वाह करीत आहोत.श्री स्वामी समर्थ मार्गाचे काम हे श्री परमपुज्य मोरेदादा व त्यानंतर सर्व सेवकन्यांचे आधारस्तंभ असलेले आदरणीय प.पु.गुरुमाऊली हे सुमारे 78 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे.सदरील कामकाज हेअत्यंत पारदर्शकपणाने चालते.
सदरील न्यास हा कायदेशीररित्या त्रंबकेश्वर येथे कार्यरत असून त्याचे कामकाज हे कायदेशीररित्या पारदर्शकपणे लोकभिमुखपणे चालविले जाते. सदरील संस्थेचे सामाजिक,अध्यात्मिक,धार्मिक स्तरावर लोकहिताची कामे केली जातात.तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाचे शेती विषयक जनजागरण व मार्गदर्शनही केले जाते व त्यासाठी श्री आदरणिय प.पु.गुरूमाऊली हे भारतभर नव्हे तर जगभर लोक प्रबोधनासाठीमेळावे घेतात.
सदरील श्री स्वामी समर्थ मार्गासाठी लाखो सेवेकरी जोडलेले असून सदरील सेवा मार्गास आदरणिय पु गुरूपाऊली यांनी व्यापक स्वरूप देवून देशात व विदेशात शेकडो सेवा केंद्र उभारलेली आहेत व सदरील सेवा केंद्रांमध्ये बाल संस्कार,युवा प्रबोधन,स्वयं रोजगार,विना हुंडा सामुहिक विवाह प्रश्नोत्तर सेवा, व्यसन मुक्ती,शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव व शेतकरी सत्संग मेळावे,दुष्काळात गुरांना चारा, पाण्याच्या टाक्यांचे वाटप,गरीब व गरजू आदिवासींना कपडे, धान्य वाटप,आरोग्य शिबीर माध्यमातून मानव रोगमुक्त करणे, प्रबोधनाकरीता ग्रंथ निर्मिती, गोधन संरक्षणाकरीता गो शाळा, वेद विज्ञान संशोधनाद्वारे संस्कृतीचे जतन या लोक कल्याणकारी योजनांचा कोट्यावधी भाविक सेवेकरी लाभ घेत आहेत.तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाने कोविड काळात लाखो गरजूना अन्नदान तसेच महाराष्ट्र शासनास सेवेकरी निवास कॉरन्टाईन सेंटर करीता निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले होते.
अशा प्रकारे शासनासही मदत करण्याच्या व शासनाचे काम करण्याच्या जबाबदान्या पार पाडण्याचे काम मार्गा मार्फत केले जाते.सदरील श्री स्वामी समर्थ परिवार सामाजिक अध्यात्मिक, धार्मिक स्तरावर लोक हिताचे काम करत आहे व सदरील मार्गाचे काम हे अखंड अविरहितपणे चालु आहे.
असे असतांना अमर रघुनाथ पाटील,रा.करण लॅण्डमार्क,प्लॉट नं.15.भावकर लेन,शिवाजी नगर.पुणे,ता.जि.पुणे मोबा.व चंद्रकांत गणपत पाठक रा.टेलीफोन एक्सचेंजच्या मागे,पाचआळी,त्र्यंबेकश्वर,त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक,यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबींचा विचार न करता बेकायदेशोरित्या वैयक्तिक स्वार्थापोटी खोटेनाटे अर्ज करून व खोट्या-नाट्या अर्जावरून आपल महानगर न्यूज पेपर व इतर वर्तमान पत्र तसेच स्थानिक चॅनलला कोणतीही शहनिशा न करता श्री स्वामी समर्थ गुरुपीठात50कोटींचा अपहार झाल्याबाबत व आदिवासींच्या जमीनीबाबत व बांधकामाबाबत जे बेकायदेशीर वक्तव्य केलेली आहेत.त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. या सदरील वक्तव्यांगुळे श्री स्वामी समर्थ भक्त परिवारामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यामुळे आमच्या सर्व सेवेकान्यांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय प.पू.गुरुमाऊली व मार्ग यांची बदनामी करून चुकीचा मेसेज समाजात परसरवण्याचे चुकीचे कृत्य वरील लोक करीत आहेत. त्याला लगाम पालणे गरजेचे आहे.प्राप्त परिस्थितीमध्ये सदरील वर नमुद लोकांनी जी वक्तव्ये केलेली आहेत ती वक्तव्ये निरर्थक व चुकीची तसेच बिनबुडाची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.तरी वर नमुद केल्याप्रमाणे सर्व सेवेकन्यांचे श्रद्धास्थान असलेले आदरणिय परमपुज्य गुरू माऊली व मार्ग याची बदनामी करून चुकीचा मेसेज जनमाणसांत पसरवून आमचे समाजात असंतोष गैरसमज निर्माण करण्याचा जो चुकीचा प्रयत्न झाला आहे व सोशल मिडीयाचा गैरवापर झालेला आहे, त्याचा विचार करून वरील लोकांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई तात्काळ करावी अशी मागणी करत सेवेकर्यांनी निषेध व्यक्त केला.
दिलेल्या निवेदनावर यशवंत भागवत भोगे,सौ.संगीता सुनिल काटकर,किशोर कल्याण श्रावगे,सौ.बेबीबाई बळीराम पवार,विकास चोपडे,गिरीश कांतीलाल गडे,निलेश बाळकृष्ण कस्तुरे,मनोज किसन पाटील,गणेश भास्कर बडगुजर,वैशाली नेरकर,सौ.सुनीता नितीन बारी,महेंद्र छगन माळी,सुनिल दशरथ गावडे, अनिकेतअनिल सरोटे,मनोज बारी यांनी स्वाक्षरी केली आहे.