जळगाव : प्रतिनिधी
छंद माणसाच्या आयुष्यात समाधानासह प्रदीर्घ आनंद देतात. त्यातच कवितेचा छंद असणे हा जगावेगळा आनंद. 40 वर्षे कवितेची आराधना आणि उपासना ‘प्रवास’ या कवी प्रकाश बारी यांच्या काव्यसंग्रहातून दिसून येते, असे प्रतिपादन कवी साहित्यिक यशवंत मोरे यांनी केले. रविवारी काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कवी टी.जे. पाटील, अपर्णा भट, व्ही.एन. पाटील, पी.एन. बारी, वसंत सपकाळे, प्रवीण भूते यांनी कविता सादर केल्या. प्रांजल, हर्षित, आदवी यांनी बालकांना भावणारी या संग्रहातील ‘गुड्डी’ ही कविता सादर केली. गजानन फुसे, रघुनाथ आटवाल, संतोष बारी, रूपचंद खलसे, प्रा. सुहास बागुल, लक्ष्मण लावणे, सुरेखा माळी, रिना ताडे, रोहिणी अस्वार, वर्षा उमरकर (अकोला), स्वाती वराडे उपस्थित होते. युवराज सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वैशाली बारी यांनी सूत्रसंचालन केले. बलवंत भालेराव, देवेंद्र अस्वार यांनी नियोजन केले.