जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाची राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धा 18 ते 20 मे दरम्यान शेगाव येथे होत आहे. स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली. पुरुष संघाच्या कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू विशाल फिरके, तर महिला संघाच्या कर्णधारपदी राष्ट्रीय खेळाडू रोशनी खान यांची निवड करण्यात आली. खेळाडूंना प्रा. चंद्रकांतअण्णा सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर आदी उपस्थित होते.
जाहीर झालेल्या संघातील खेळाडू
पुरुष संघ : विशाल फिरके (कर्णधार) विजय न्हावी, स्वप्निल महाजन, देवेश पाटील, रोहित नवले, गिरीश पाटील, भूपेंद्र भारंबे, सचिन भंगाळे, दीपेश पाटील, हर्षल परदेशी, नीरज कोळी, दीपक डिके, प्रशिक्षक अनिल माकडे आणि संघ व्यवस्थापक लीलाधर पाटील. महिला संघ : रोशनी खान (कर्णधार), चैताली चौधरी, सायली बडगुजर, नेहा कंगटे, वैष्णवी पाटील, निवेदिका कोळंबे, मयूरी चौधरी, तेजस्विनी झांजे, तनुजा धनगर, दिव्या काळे, हर्षदा कोळी, दीक्षा तेलंग, संघ प्रशिक्षक अक्षय टेमकर आणि संघ व्यवस्थापक शिल्पा सोनवणे.
