जळगाव ः प्रतिनिधी
सध्याच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात संस्काराची जपणूक आवश्यक आहे. सुसंस्कारित जीवनासाठी व्रतबंध संस्कार हवे. ब्राह्मण सेवा संस्थेने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन दादा महाराज जोशी यांनी येथे केले. महाबळ परिसरातील ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे 30 बटूंचा व्रतबंध सोहळा बुधवारी हतनूर हॉल मध्ये उत्साहात झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
संत सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा संदेश पाठवला. कोविडच्या दोन वर्षांच्या काळात खंडित झालेला हा सोहळा प्रचंड प्रतिसादात झाला. त्यात जिल्ह्यातील जळगावसह शेंदुर्णी, एरंडोल, नशिराबाद, शिरपूर, ठाणे अशा विविध ठिकाणच्या बटूंचा सहभाग होता. कार्यक्रमास दादा महाराज जोशी, महापौर जयश्रीताई महाजन, माजी महापौर सीमा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, शारदा वेद पाठशाळेचे संचालक अशोक साखरे,निलेश कुलकर्णी, मुकुंद धर्माधिकारी, उद्योजक सतीश शर्मा, राजू वाणी, भूषण महाजन, अमोल जोशी, भूषण आग्रे, अशोक वाघ, किरण टेंटचे आर. सी. दलाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रवि जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले व बटूंना संथा दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान परशुराम पुतळ्याचे पूजन करण्यात आले. स्वागत ज्येष्ठ उपाध्यक्षा विद्या धर्माधिकारी, उपाध्यक्ष भूपेश कुलकर्णी, सचिव नंदू नागराज, कोषाध्यक्ष अविकुमार जोशी, सदस्य अजय कुलकर्णी, हेमंत कानगो, अमला पाठक, ऋतुजा संत, जयंत संत, वैभव धर्माधिकारी यांनी केले. प्रा. वर्षा पाठक यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्याबद्दल आर. सी. दलाल यांचा सपत्नीक तर भूषण आग्रे, भक्ती जोशी यांचा सत्कार महापौर जयश्रीताई महाजन आणि विष्णू भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
मोफत संस्कार वर्ग घेण्याची आहे तयारी
अशोक साखरे व्रतबंध सोहळ्यात बोलतांना शारदा वेद पाठशाळेचे संचालक अशोक साखरे गुरुजी यांनी मुलांना संस्कारित करण्यासाठी मातांनी पुढाकार घ्यायला हवा. ज्या बटूंना संध्या कशी करावी हे शिकायचे असेल तर त्यासाठी आपण निःशुल्क वर्ग घेऊ असे घोषित केले. उपक्रमास दीपाली कुलकर्णी, रामदासी ग्रुपचे सदस्य नवरंग कुलकर्णी, नरेंद्र दशपूत्रे, चंदू शर्मा, मनोज दाणी, भूषण भट, संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमस्थळ सुरेश जोशी यांनी रांगोळ्या काढल्या होत्या.