जळगाव ः प्रतिनिधी
केसीईच्या पी. जी. महाविद्यालयात पी. जी. टेक्नॉलॉजीया स्पर्धा नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जे. एन. चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. जावेद खान, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. संदीप पाटील, डॉ. आर. एम. पाटील हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांतील सादरीकरण, व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ॲनिमेटेड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी निमेटेड पॉवर पॉइंटद्वारे भाग घेतला. स्पर्धेसाठी महाविद्यालयातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. चौधरी यांच्या हस्ते रोख पारितोषिके वितरित करण्यात आले. डॉ. स्नेहल देशमुख व वैशाली पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सारंग बारी यांनी आभार मानले. या वेळी प्राध्यापक, इतर कर्मचारी आदी उपस्थित होते.