जळगाव ः प्रतिनिधी
येत्या 12 ते 18 मे दरम्यान आंतरजिल्हा महाराष्ट्र राज्य 17 वर्षांखालील मुलींचे फुटबॉल स्पर्धा नाशिक येथे होत आहे. जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना 13 मे रोजी वाशिम जिल्ह्यासोबत होणार आहे. जळगाव जिल्हा 17 वर्षांखालील मुलींचा फुटबॉल संघाची घोषणा सचिव फारुक शेख यांनी काल केली आहे.
हा संघ मनोज सुरवाडे यांच्या नेतृत्वात अब्दुल मोहसीन व प्रो. डॉ. कोल्हे यांच्या समितीने निवडला आहे. या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून मोसेस चार्ल्स, प्रशिक्षक म्हणून राहील शेख अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सह सचिव प्रो. डॉ. अनिता कोल्हे, ताहेर शेख आदी उपस्थित होते.
जिल्हा फुटबॉल संघ असा
कर्णधार शीतल सहानी (जळगाव), उपकर्णधार क्रिशा बुला (भुसावल), रिया गोगिया, पायल कोली, रोशैल डिसुजा, साक्षी मोरे, चैताली सोनवणे, प्रांजल देशमुख, जास्मिन चार्ल्स, तृप्ती चौधरी (सर्व भुसावल) अंजली शर्मा, दुर्गा विसपुते, पूजा इनधाटे, रिया ठाकूर, काजल वांद्रे, दिव्या काळे, निकिता पवार, साक्षी पाटील (सर्व जळगाव).