जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जागतिक थलेटिक्स दिनानिमित्ताने परिसंवादचे आयोजन व साहित्य पूजनाचा कार्यक्रम शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात घेण्यात आला.
थलेटिक्स साहित्याचे पूजन महाराष्ट्र थलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. नारायण खडके व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी यांनी केले. ॲथलेटिक्स दिनानिमित्ताने झालेल्या परिसंवादात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व व साजरा करण्याचा उद्देश यावर मार्गदर्शन केले.
या निमित्ताने राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू संजय मोती, संजय तायडे, धीरज जावळे, तेजस तायडे यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. तुळशीराम नेमाडे, अशोक कोल्हे, राष्ट्रीय खेळाडू बन्सी माळी, विजय सैंदाणे, विजय विसपुते, नितीन पाटील, जितेंद्र शिंदे, डॉ. विजय पाटील, प्रा. इक्बाल मिर्झा, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, साजिद पठाण यांची उपस्थिती होती. नीलेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. योगेश सोनवणे यांनी आभार मानले.